अकोला (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिव्यांग बांधवांसाठी कुत्रीम अवयव व सहाय्यभुत साधने मोफत वाटपासाठी पूर्वतपासनी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व अधिकारी मंत्रालय ,भारत सरकार भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम, कानपुर व जिल्हा प्रशासन, समाज कल्याण जिल्हा परिषद, अकोला यांच्या साहायाने दिव्यांग बंधू – भगिनींसाठी एडीप ( ADIP ) योजनेंतर्गत कुत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर दिनांक २१ जून न प सभागृह जुनी चावडी बाळापूर व २२ जून सिदाजी महाराज संस्थान पातूर येथे सकाळी १० ते दु : ०४.०० दिव्यांग बांधवांसाठी आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांनी शिबिरास येतांना खालील पैकी आवश्यक असे कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत. आपल्या नजीकच्या आपले सरकारवर नोंदणी करून नोंदणी केलेला. नोंदणी क्रमांक, दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा उत्पनाच्या दाखल्याची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो सोबत आणावे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.