अकोला,दि.7:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून काटेपूर्णा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.पर्यावरण संवर्धन व संरक्षण करणे सर्वाचे कर्तव्य असून शाश्वत पर्यावरण राखण्यासाठी शाळा, महाविद्यालय विद्यार्थीं, गावकरी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांनी केले. तसेच उत्कृष्ठ कार्य केलेल्या वन अधिकारी व कर्मचारी यांचे सत्कारही यावेळी करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांचे “ओन्ली वन अर्थ’ या विषया व्याख्याने झाले. काटेपूर्णा अभयारण्यांचे माहिती फलक व पोस्टरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रथम सत्रात सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षक डी. पी. निकम यांनी निसर्ग चक्र व मानवानी केलेली हानी व उपाययोजना या विषयावर संवाद साधला. बुलडाणाचे उपवनसंरक्षण्क अक्षय गजभिये यांनी अस्वल यांच्यासोबत होत असलेल्या मानव प्राणी संघर्ष व उपाय योजना या विषयी सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे दिली. भारतीय वन्यजीव संस्थानचे संशोधक जयदीप पाटील यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे होत असेलेले सत्तांतर या विषयी महत्वपूर्ण व रोमांचीत अनुभव सादरीकरणाव्दारे मांडले. त्यानंतर शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद शिरभाते यांनी लोक सहभागातून पर्यावरण संवर्धन व संरक्षण या संदर्भात माहिती दिली. तर वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी काटेपुर्णा अभयारण्यांचे व्यवस्थापन सादरीकरण केले. मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान उपजिविकाचे तज्ज्ञ प्रफुल्ल सावरकर यांनी लोणार वन्यजीव अभयारण्याची ओळख या विषयाचे सादरीकरण केले.
अकोला वन्यजीव, अकोला प्रादेशिक व सामाजिक तसेच बुलडाणा प्रादेशिक विभागातील वने व वन्यजीव संवर्धन व संरक्षण संदर्भांत उत्कृष्ट कार्य केले अशा वन अधिकारी, वन कर्मचारी, वनमजूर, तसेच इको गाईड क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या अशासकीय संस्था, निसर्गकट्टा संस्था व साळुकांबाई राउत महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
काटेपूर्णा अभयारण्य येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहणे म्हणून अमरावती येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक डी. पी. निकम हे होते. तर अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड़्डी, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक मुमंत सोलंके, अकोला प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक के. अर्जुना व बुलडाणा प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक तसेच अकोला वन्यजीव विभागाचा अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी असलेल अक्षय गजभिये आदि उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव, काटेपुर्णा अभयारण्य व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन पार पाडली. तसेच मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानचे स्वप्नील बांगडे व मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश तापस, ज्ञानगंगा अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. लोखंडे यांनी सहकार्य केले. तर या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रफुल्ल सावरकर यांनी केले.