महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एका मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना मास्क सक्तीसंदर्भात पत्र पाठवले आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या केसेसमध्ये होणारी वाढ पाहता सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असल्याचं या पत्रात नमुद करण्यात आहे. यामध्ये रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य असणार आहे.