इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) यूजर्संसाठी नेहमी नवनवीन फीचर जारी करत असते. आता WhatsApp एक नवीन फीचर विकसित करत आहे; जे यूजर्संना टेक्स्ट मेसेज पाठवल्यानंतर (sent) एडिट (edit) करण्याची मूभा देईल. WABetaInfo च्या एका अहवालानुसार, WhatsApp ही सुविधा नजीकच्या काळात आणण्याची शक्यता आहे.
सध्या यूजर्संना केवळ स्वतःसाठी किंवा चॅटमधील प्रत्येकासाठी मेसेजिस डिलीट करण्याचा पर्याय आहे. पण आता नवीन फीचर पाठवलेला मजकूर एडिट करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करुन देईल. कंपनी सध्या अँड्रॉइड (Android), iOS आणि डेस्कटॉपसाठी व्हॉट्सअॅप बीटा (WhatsApp beta) नवीन फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपने ५ वर्षांपूर्वी या फीचरवर काम करण्यास सुरुवात केली होती, असेही सांगितले जाते.
WABetaInfo द्वारे शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, हे फीचर प्रत्यक्षात कसे काम करेल याबद्दल अधिक माहिती दिली आहे. जर यूजर्संना नवीन फीचरचा वापर करुन आधीच पाठवलेला मेसेज एडिट करायचा असेल, तर त्यांना मजकूर निवडावा लागेल. कॉपी आणि फॉरवर्डसह पॉप अप (pops up) होणारा edit पर्याय निवडावा लागेल.
WhatsApp आगामी फीचरमध्ये यूजर्संना आधीच पाठवण्यात आलेल्या text messages मधील टायपिंग त्रुटी दूर करण्यास परवानगी देईल. पण हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे की इतर text messages प्रमाणे तुम्ही एडिट केलेला मजकूर (edited text) डिलीट (delete) करु शकणार नाही.
स्क्रीनशॉट शेअर करत WABetaInfo ने म्हटले आहे की Android साठी WhatsApp हे बीटावरून घेण्यात आले आहे. हे iOS आणि डेस्कटॉपसाठीदेखील रोल आउट होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, “एडिट मेसेजिसचे मागील व्हर्जन तपासण्यासाठी कदाचित एडिट हिस्ट्री नसेल. पण या फीचरवर सध्या काम सुरु असल्याने ते जारी करण्यापूर्वी त्यांच्या योजना बदलू शकतात.”
हे फीचर सध्या विकसीत होत आहे. हे फीचर प्रत्यक्षात येईपर्यंत कंपनी त्याचे आणखी सुधारीत व्हर्जन घेऊन येऊ शकते. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्हाला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.