केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) प्रीमियम दरात वाढ केली आहे. नवीन दर १ जून २०२२ पासून लागू होतील, असे सरकारने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
या विमा योजना सात वर्षापूर्वी म्हणजे २०१५ मध्ये सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच या विमा योजनांच्या प्रीमियम दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दोन्ही योजनांच्या प्रीमियमचे सुधारित दर देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा (PMJJBY) प्रीमियम ३३० रुपयांवरुन ४३६ रुपये करण्यात आला आहे. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) चा प्रीमियम १२ रुपयांवरून २० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

अशी आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही एक प्रकारची वैयक्तिक अपघात विमा योजना आहे. हे विमा संरक्षण १ जून पासून सुरू होऊन ३१ मे पर्यंतच्या एक वर्षाच्या कालावधीसाठी असते. या योजनेत एकूण २ लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे. कोविड काळात या योजनांच्या कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. या काळात प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि दावे जलद निकाली काढण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या होत्या.
PMJJBY आणि PMSBY या योजनांमध्ये ३१ मार्च २०२२ पर्यंत अनुक्रमे ६.४ कोटी आणि २२ कोटी सदस्य नोंदणीकृत होते. ३१ मार्च पर्यंत या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांकडे प्रीमियमची १,१३४ कोटी रुपये जमा झाली आहे.