पुणे: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022 च्या आयोजनास महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएनच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही स्पर्धा पुणे शहर आणि जिल्ह्यात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 32 विविध क्रीडा प्रकार असून, नऊ हजारांहून अधिक खेळाडू, अधिकारी पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर, अॅड. धनंजय भोसले, वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष प्रदीप गंदे, संजय शेटे, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह सदस्य उपस्थित होते.