तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील तळेगाव परिसरातील शेतकरी यांनी गेली सहा महिन्या पासून रब्बी पिकांची तयारी केली मात्र सहा महिने अतोनात कष्ट करून शेतीत घाम गाडून कांदा पीक घेतले आशा होती की शासन हमीभाव देईल मात्र तसे झाले नाही काही खाजगी व्यापारी हे शेतीत कांदा मागणी साठी येऊन कांदा प्रति 1 ते 2 रु किलो मागणी करीत आहेत त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शेतीतील 200 क्विंटल कांदा हा गुर ढोरे मेंढरं यांना चराई साठी देऊन आपला राग व्यक्त केला आहे कारण कांद्या पिकासाठी केलेला खर्च तर निघेणाच उलट खिश्यातून खर्च होत असल्याने उत्पादन शेतकरी हवालदील झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक मानसिक परिस्थिती ढासळलेली निर्माण झालेली आहे त्यामुळे अश्या काही नैराश्यात आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा नुकसानभरपाई तालुका कृषी विभागाने सर्व्ह करून शासना कडून मिळून द्यावी जेणेकरून शेतकरी चिंतामुक्त होईल
कांद्याला 1 रू किलो भाव मिळत असल्याने कांदा गोणीत भरणे व विकायला बाजारात नेणे. मजुरी व वाहतूक खर्चही निघत नसल्यामुळे 200 किंटल कांदा जनावरांना खाऊ घातला पावसाळा जवळ आला आहे शेताची मशागतीची कामे तसीच राहीलेला आहेत. कांद्याला लावलेले पैसे निघणार नाहीत त्यामुळे पुढील खरीपासाठी शेत तयार करणे बियाणे खत आणण्यासाठी पुन्हा सावकाराच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. बॅक सुद्धा पिक कर्ज देण्यास तयार होत नाही. आता जगावे की मरावे या द्विधा मनस्थितीत पडली आहे शासनाने कांदा नुकसानभरपाई पैकेज जाहीर करावी अशी विनंती शेतकरी म्हणून व्यक्त करतो आहे
विजय ताथोड
शेतकरी तळेगाव डवला
शेतकऱ्यांनी असा कांदा फेकून किंवा जनावरांना देऊन नुकसान करून घेऊ नये ज्यांचेकडे साठवणूक करण्यासाठी सुविधा आहे त्यांनी कांदा साठवून ठेवावा, व भाव वाढल्या नंतर विक्रीस काढावा असे आवाहन कृषी विभागा तर्फ करण्यात येत आहे
मिलिंद वानखडे
तेल्हारा तालुका कृषी अधिकारी