मंगळूर : कर्नाटकात पुन्हा ‘हिजाब’ वाद (Karnataka hijab row) सुरु झाला आहे. मंगळूर विद्यापीठाने (Mangalore university) सध्याच्या गणवेश नियमात सुधारणा केली आहे. यानुसार विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या संपूर्ण कॅम्पसमध्ये आणि वर्गात डोक्यावर स्कार्फ घालण्यावर बंदी घातली आहे. पण या निर्णयाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी जोरदार विरोध केला आहे. यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा नवा नियम येथील विद्यापीठाच्या महाविद्यालयासह सहा घटक महाविद्यालयांना लागू करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
याआधी महाविद्यालयांत मुस्लिम मुलींना डोक्यावर शाल पांघरण्याची परवानगी होती. दरम्यान, नुकतीच बंगळूर येथे झालेल्या विद्यापीठ सिंडिकेटच्या बैठकीनंतर हा नियम रद्द करण्यात आला. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सहा महाविद्यालयांना नवीन नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.