मुंबई : येत्या 1 जूनपासून मोठ्या वाहनांसह सर्वच दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना थर्ड पार्टी इन्श्युरन्ससाठी जास्त प्रीमियम भरावा लागेल. भारतीय विमा आणि नियामक आणि विकास प्राधिकरणाने (ईर्डा) मोटार वाहनांच्या थर्ड पार्टी इन्श्युरन्सचे दर वाढवण्यासाठी मसुदा तयार केला आहे.
या नव्या नियमांनुसार, चारचाकी वाहनांसाठी 1,000 सीसी क्षमतेच्या खासगी वाहनांसाठी अंदाजे 2,094 रुपये भरावे लागतील. याआधी ही रक्कम अंदाजे 2,072 रुपये होती. याचप्रमाणे 1,000 सीसी ते 1,500 सीसी क्षमतेच्या खासगी वाहनांसाठी अंदाजे 3,416 रुपये द्यावे लागतील. आधी त्यासाठी सर्वसाधारणपणे 3,221 रुपये मोजावे लागत होते. तर 1,500 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहन मालकांना अंदाजे 7,890 रुपयांच्या तुलनेत 7,897 रुपये प्रीमियमसाठी मोजावे लागतील.