अकोला,दि.26: संसदीय क्षेत्र रस्ता सुरक्षा जिल्हा अकोला बैठकीत झालेल्या ठरावानुसार रस्ते सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ऑटोरिक्षा वाहनाच्या दर्शनी भागास शहरी भागातील वाहन असल्यास हिरवा व ग्रामिण भागातील वाहन असल्यास लाल रंगाचे स्टिकर लावण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी दि.15 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती.
तथापि, रस्ते सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक संधी म्हणून हे स्टिकर्स लावण्यासाठी दि.30 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे. तरी ऑटो रिक्षाचालकांनी ऑटोरिक्षा संघटना जिल्हा अकोला यांच्या मार्फत रिक्षाच्या दर्शनी भागात स्टिकर्स लावुन घ्यावे. तसेच परवानाधारक ऑटोरिक्षाचालकांनी आपल्या परवाना क्षेत्रातच वाहन चालवावे, नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिला आहे.