अकोट (देवानंद खिरकर)- समस्त मुस्लीम समाज अकोटच्या वतीने स्थानिक जामा मशिदीत ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वात मोठा धर्म हा मानवतेचा धर्म आहे. मानवजात हे फक्त एका पालकाचे अपत्य आहे. सर्व धर्म, बंधुता आणि मानवतेचा आदर करा असे कुराणात सांगितले आहे. तसेच प्रत्येक धर्मात मानवतेला प्राधान्य दिले आहे. ज्याप्रमाणे एका बागेत अनेक प्रकारची फुले एकत्र राहतात, त्याचप्रमाणे आपल्या देशात विविध धर्माचे लोक एकत्र राहतात. सर्वांनी मिळून बागेचे रक्षण करायचे आहे, त्यासाठी एकत्र राहायचे आहे. हा संदेश देत मस्जिद परिचयाचा कार्यक्रम समाज आणि देशवासीयां साठी आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते, प्रमुख पाहुणे म्हणून अकोट शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे व गामीन पोलीस ठाण्याचे एपीआय पंचबुद्धे उपस्थित होते.
अॅड अफझल गाझी यांनी मशीद म्हणजे काय, नमाज, नमाज कशी करावी आणि मशिदीशी संबंधित इतर गोष्टींची माहिती दिली. ईशतेयाक ऊल्ला खान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पवित्र कुरान मध्ये सहा हजार सहाशे सहासष्ट श्लोक आहेत. या पैकीं फक्त एकशे सहा श्लोक मुस्लिमांन सठी आहेत बाकीच्या श्लोकांमध्ये सर्व धर्माचे लोकाचा उल्लेख आहे. म्हणूनच कुराण तुमचे पण आहे. मस्जीद तुमची पण आहे बरं, आम्ही तुमचे अपराधी आहोत. तुम्हाला इथे बोलवायला आम्हाला उशीर झाला. म्हणून, आम्ही तुमची माफी मागतो. पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी अनेक शंकांचे निरसन झाले. मी पहिल्यांदाच मशिदीत आलो आहे, इथली व्यवस्था पाहून मी थक्क झालो आहे. असे कार्यक्रम काळाची गरज आहे, असे सांगितले. कार्यक्रमाला हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वानी परिश्रम घेतले.