अकोट(देवानंद खिरकर )- अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड मार्फत होणारी हरभऱ्याची खरेदी तांत्रिक अडचणीमुळे बंद झाल्याने शेतकऱ्यांचा अंदाजे ५ कोटी ४० लाख रुपयांचा १० हजार क्विं. चना हा तसाच पडून असल्याने शेतकऱ्यांनी सदर बाब शिवसेना गटनेते मनिष कराळे यांच्या कानावर घातली असता त्यांनी शेतकर्यांच्या समस्या वर एल्गार पुकारत शेतकऱ्यांसह उपविभागीय कार्यालयावर धडक दिली.याबाबत प्रशासनाला अवगत करून शेतकऱ्यांच्या समस्यांवर तात्काळ उपायोजना करून चना खरेदीत समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले. तसेच सदर समस्या न सुटल्यास शिवसेना उग्र आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला.
आकोट बाजार समितीत नाफेड मार्फत 22 मे रोजी शेतकऱ्यांना चना घेऊन यावा असा संदेश असल्याने २३ मेपासून बाजार समितीत नाफेड ला विक्री करता शेतकऱ्यांनी चना आणला मात्र 26 मे झाली तरीही नाफेडचे सर्वर बंद असल्या कारणाने नाफेड मार्फत एकाही गाडीचे माप घेतले गेले नसल्याने मार्केट यार्डात सुमारे 200 पेक्षा जास्त वाहनांमधील शेतकऱ्यांचा चना खरेदी च्या प्रतीक्षेत असल्याने शेतकऱ्यांचे ऐन पेरणीच्या तोंडावर आर्थिक कोंडी होत आहे. तसेच शेतकऱ्यांना उन्हाच्या लाटेत ही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने या समस्या विरोधात शेतकऱ्यांना घेऊन मनीष कराळे यांनी उपविभागीय कार्यालय धडक दिल्याने प्रशासनाने याबाबत तात्काळ दखल घेणार असल्याचे त्यांना कळवले आहे.
निवेदनावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी असून यामध्ये पद्माकर महल्ले, प्रमोद ढेलकर, विद्याधर माकोडे, अनिल मा. गावंडे, मनीष जंजाळ, गोपाल इंगळे दशरथ फुसे, नारायण ढोले, गोपाल वाकोडे अंकुश वानखडे, अजिंक्य पाटकर, राहुल पोटे गजानन अवचार नागेश शेंडे, सोपान बिहाडे, नंदू वानखडे, दादाराव वाको, सोहम गणोरकर किशोर गट्टाणी आदीं शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.