तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याचे आदिवासी गेल्या 30 वर्षांपासून आपल्या हक्काच्या जागे अभावी घरकुला पासून वंचीत आहेत त्यामुळे ग्रामपंचायत ने घरकुल नोटीस देऊन जागा उपलब्ध करा व घरकुल मिळावा अश्या नोटीस बजवल्या आहेत दुसरीकडे मात्र प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत घरकुल योजनेसाठी जागा उपलब्ध करून मिळणे बाबत अर्ज घरकुल धारकांनी तेल्हारा तहसीलदार बीडीओ यांच्या कडे धाव घेऊन अर्ज दिले आहेत.
सर्व आदिवासी यांनी दिलेल्या अर्जावरील नमूद केल्या प्रमाणे आदिवासी समाजातील मोयपाणी येथे मागील ३० वर्षापासून येथे रहिवाशी निवासी आहेत मोयपाणी येथे गावतीलच काही शेती मध्ये असलेल्या च्या जागा मध्ये कच्चे झोपड्या मध्ये राहत आहेत. ग्रामपंचायत रेकोर्डला जागा नावाने उपलब्ध नसल्याने शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतगर्त गट ग्रामपंचायत झरी बाजार मोयपाणी यांच्या पपत्र ब यादी सन २०१६-२०१७ नुसार घरकुल मंजूर पात्र असल्याचे पत्र दिले आहेत. मात्र स्वताची जागा उपलब्ध नसल्याने सर्व आदिवासी घरकुला पासून आज पर्यंत वंचित राहलेले आहेत त्यामुळे पात्र घरकुलसाठी गावातीलच जागा उपलब्ध करून द्यावी असे अर्ज तेल्हारा तहसीलदार बीडीओ यांना सादर केले आहे, तरी यावर तालुका प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. निवेदनावर ग्यानसिंग बारूला, दसेराम बारेला मगन भिरुडा, कांशीराम डावर, कांशीराम सोळंके, जहागीर भिरुडा, हरसिंग बामणे, दादरसिंग बारेला, प्यारसिंग खिराडे, मसाराम बारेला सखाराम सत्या, नरसिंग अवया आदी आदिवासी यांच्या सह्या आहेत.
सर्व आदीवासी यांचे जागा मागणी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार तलाठी व मंडळ यांचे कडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल त्यानुसार पुढील आदेशानुसार कार्यावही करता येईल.
डॉ संतोष येवलीकर तहसीलदार तेल्हारा