अकोला दि.25 – संघर्षग्रस्त बालकांकरीता काम करणाऱ्या बाल न्याय मंडळ सदस्यांची निवड महिला व बालविकास विभागांच्या निवड समितीव्दारे करण्यात आले आहे. याबाबत शासन राजपत्रात ॲड. वैशाली गावंडे व ॲड सारीका घिरणीकर या दोन सामाजिक कार्यकर्ताची बाल न्याय मंडळावर निवड झाली आहे. त्यांनी नुकताच ॲड. संजय सेंगर व ॲड. अनिता गुरव(शिंदे) यांच्याकडून पदभार स्विकारला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.
बाल न्याय मंडळ एक न्यायीक यंत्रणा असुन त्यामध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दोन सामाजीक कार्यकर्ता सदस्य असतात. मंडळ हे खंडपीठ असुन या खंडपीठास बालन्याय मडळास दंड प्रक्रीया संहीता 1973 प्रमाणे महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांचे अधिकार असतात. बाल न्याय मंडळ हे प्रामुख्याने विधी संघर्षग्रस्त बालकांकरीता कार्यरत असून ते बालकांच्या क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ व्यक्ती असतात.