अभिनेत्री केतकी चितळेच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तिला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.
केतकीने नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट प्रवास करतात, अशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. या पोस्टवर फेसबुक युजर सूरज शिंदे यांच्यासह दोन जणांनी आक्षेपार्ह भाषेत कमेंट केली होती. याविरूद्ध घणसोली येथील रहिवाशी व आंबेडकर युवा संघाचा सदस्य स्वप्निल जगताप यांनी तक्रार दिली होती. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्यानंतर ९ सप्टेंबर २०२१ रोजी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीला अटक झाली आहे. राज्यात सुमारे १५ ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिने आपल्या फेसबूक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बदनामीकारक अपमान करणारा मजकूर होता. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. ठिकठिकाणावरुन निषेध व्यक्त केला जात आहे.