पुणे : मान्सून अत्यंत वेगाने दक्षिण अरबी समुद्राकडे येत असून, तो शनिवारी 21 मे रोजी दक्षिण अरबी समुद्रात धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी बंगालच्या उपसागरातील म्यानमार बेटांजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नव्या चक्रीवादळाची शक्यता आहे.
मान्सूनने बंगालच्या उपसागरासह अंदमान बेट व्यापून अरबी समुद्राच्या दिशेने कूच केले. आगामी बारा ते पंधरा तासांत तो अरबी समुद्राकडे धडकणार आहे. मान्सूनची आगेकूच सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी म्यानमारजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नव्या चक्रीवादळाच्या निर्मितीची शक्यता आहे. मात्र, हा पट्टा बारा तासांत शमण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.