जर आपण SBI खातेधारक असाल तर ही बातमी आपल्या कामाची आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. रोख रक्कमेचा व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी टाकणे अनिवार्य झाले आहे. आता एसबीआय ग्राहक ओटीपी टाकल्याशिवाय पैसे काढू शकत नाहीत. ग्राहकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवणे हे ओटीपी सुविधा सुरू करण्यामागील मुख्य कारण आहे.