अकोला– कौशल्य विकास सोसायटी व युथ एड फाऊंडेशन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यमिता यात्रा व उद्योजकता प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यात दि. 20 ते 22 मे राबविले जाणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी दिली आहे.
उद्यमिता यात्रेचे जिल्ह्यात शुक्रवार दि. 20 मे रोजी आगमन होत आहे. या उद्यमिता यात्रेचे स्वागत व प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते होणार आहे. प्रशिक्षण शिबिरात युवकांचे समुपदेशन करुन त्यांना स्वंयरोजगाराकरीता प्रेरीत करणे हा उद्देश आहे. युवकांमधील नवनवीन संकल्पना, स्टार्टअपचा विकास, सुक्ष्म व्यवसाय, लघुउद्योगांना चालना देण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील युवक-युवतींपर्यंत पोहोचविण्यास या उद्यमिता यात्रेच्या माध्यमातून मदत होणार आहे. तरी प्रशिक्षणास इच्छूक उमेदवारांनी उद्यमिता यात्रेचे जिल्हा समन्वयक रोहन किसवे (मोबाईल क्रमांक ८६६८४७१८३२), अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक रोहीत बारस्कर यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला कळविले आहे.