अकोला- सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन महाडिबीटी पोर्टलवरून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नोदंणीकृत झालेल्या अनुसूचित जाती व विजाभज, इमाव प्रवर्गातील शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर मोठया प्रमाणात प्रलंबित आहे. प्रलंबित अर्ज महाविद्यालयास्तरावर तातडीने निकाली काढावे, असे सूचना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी दिल्या.
महाडिबीटी पोर्टलवर शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील जिल्ह्यातील अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे विद्यार्थीस्तरावर 1 हजार 274 तर महाविद्यालयस्तरावर 841 असे एकूण 2 हजार 115 अर्ज तसेच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थीस्तरावर 1 हजार 309 अर्ज तर महाविद्यालयस्तरावर 1 हजार 217 असे एकूण 2 हजार 526 अर्ज मान्यतेस्तव प्रलंबित आहेत. प्रलंबित अर्ज निकाली काढण्यास दि. 31 मे 2022 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे.
जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी व पालकांनी मुदतीत परिपूर्ण अर्ज महाविद्यालयास सादर करावा. तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी महाविद्यालयास्तरावरील विविध कारणास्तव अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील प्रलंबित असलेले 2 हजार 58 अर्जावर ऑनलाईन प्रणालीव्दारे समाजकल्याण कार्यालयाकडे अग्रेषित करावा. आवश्यकतेनुसार संबधित शैक्णिक विभागाशी समन्वय सााधून त्रुटीची पुर्तता करुन प्रणालीव्दारे शिष्यवृत्तीचे अर्ज मान्य करावेत. विहित मुदतीत संबधित महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्ज समाजकल्याण कार्यालयाकडे ऑनलाईन अग्रेषित करावा. अनुसूचित जाती व मागास प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांची राहिल यांची नोंद घ्यावी. प्रलंबित अर्जासंबधित अडचणी असल्यास सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय यांचेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.