तेल्हारा(प्रतिनिधी)- लोकसहभागातुन नदीपाञातील गाळ काढुन नदीचे खोलीकरण करणे शेततळ्या मधील गाळ काढणे हि काळाची गरज असुन गाळाच्या मातीचा उपयोग शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केल्यामुळे,जमीनीची पोथ सुधारेल आणी शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.
हि चळवळ सर्व ग्रामपंचायतीने राबविल्यास निश्चितपणे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल असे मत गटविकास अधिकारी भारत चव्हाण यांणी व्यक्त केले ते ईसापुर येथिल नदीपाञातील गाळ काढण्याच्या उदघाटनपर कार्यक्रमात बोलत होते यावेळी गटविकास आधिकारी भारत चव्हाण, वरिष्ठ लीपीक वसंत चव्हाण, सरपंच पती आनंद बोदडे, महादेवराव नागे उपसरपंच, रोषन देशमुख तलाठी, कु.वर्षा फाळके सचिव, विश्वास घाटोळ ,प्रविण वारुळकर, संजय नागे ,प्रफुल वारुळकर,अमोल पोहनकार, राजेंद्र वारुळकर, संजय नागे, दत्ता तायडे, संतोष पोहनकार तसेच ग्रा.पं कर्मचारी संघपाल ससाने ,सोनु मोडोकार, गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अकोला निमा अरोरा यांचे आदेशावरुन शेततळ्यातील गाळ काढणे व नदीचे खोलीकरण करण्याच्या सुचना नुकत्याच देण्यात आल्या असुन उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे व तहसिलदार डाॕ.संतोष येवलीकर तसेच गटविकास अधिकारी भारत चव्हाण यांच्या समन्वयातुन हि चळवळ यशस्वी रित्या राबविण्यासाठी दि. १२ मे रोजी तहसिल कार्यालय तेल्हारा येथे सरपंच सचिव तलाठी यांची सभा संपन्न झाली यामध्ये सविस्तर माहीती देण्यात आली हि चळवळ यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत ईसापुर च्या वतीने आम्ही प्रयत्न करनार आहोत.
मिराताई बोदडे,
सरपंच ग्रामपंचायत ईसापुर