मुंबई: कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने देशांतर्गत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम महामंडळाने (आयआरसीटीसी) 18 दिवसांची ‘रामायण यात्रा’ आयोजित केली आहे. पहिली ‘भारत गौरव’ वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी प्रभू रामचंद्रांच्या जीवनकार्याशी संबंधित सर्व प्रमुख ठिकाणांना भेट देईल.
भारत गौरव पर्यटक रेल्वेगाडी 21 जूनला दिल्लीतून 18 दिवसांच्या रामायण यात्रेवर रवाना होईल. या गाडीचा पहिला थांबा प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत असेल. बक्कर, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, नाशिक आणि पुढे रामेश्वरम असा हा मार्ग असेल. सुमारे 8 हजार किलोमीटरचा प्रवास करून ही विशेष रेल्वेगाडी 18 व्या दिवशी दिल्लीत दाखल होईल.
देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘देखो अपना देश’ उपक्रमांतर्गत भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आयआरसीटीसीने झरूीां आणि ठरूेीरिू पेमेंट गेटवेशी करार केला आहे. पर्यटकांना 3, 6, 9, 12, 18 किंवा 24 महिन्यांच्या हप्त्यांचीही सुविधा मिळेल. हे हप्ते डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे अदा करता येतील.