अकोला दि.11:- ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण नुकतेच (दि.5) पार पडले. पंचायत समिती सभागृह , बार्शी टाकळी येथे हे प्रशिक्षण पार पडले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण कक्ष यांच्याद्वारे हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणास ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य, सचिव, अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील सहभागी झाले होते.
या कार्यशाळेत ग्राम बाल संरक्षण समितीची भुमिका, कर्तव्य व जबाबदारी, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012, बालविवाह कायदा, बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या यंत्रणा. महिला व बालविकास विभागाअंतर्गत बालकांसंबंधिच्या विविध योजना याबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा बालसंरक्षण कक्ष सुनिल लाडुलकर, नितीन अहिर, सतिश राठोड, योगेंद्र खंडारे यांनी साधन व्यक्ती म्हणून काम पाहिले. या प्रशिक्षणासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी चेके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, सुनिल सरकटे, सचिन घाटे, संगिता अभ्यंकर, रेवत खाडे, रेश्मा मुरुमकार यांनी सहाय्य केले.