नवी दिल्ली : मोहालीत असणाऱ्या पंजाब पोलिसांच्या गुप्तहेर विभागाच्या मुख्यालयाच्या बाहेर सोमवारी रात्री स्फोट झाला. यामध्ये किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती समोर आलेली नाही. पंजाब पोलिसांनी सांगितले की, “पंजाब पोलिसांचा गुप्तहेर खात्याच्या मुख्यालयाच्या रस्त्यावर एक राॅकेटचलीत ग्रेनेड, आरपीजी डागण्यात आले आहे. त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. हा हल्ला आरपीजी हल्ला असून हा स्फोट साधा आहे”, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.
रविवारी पंजाब पोलिसांकडून तरनतारन जिल्ह्यातील एका गावातून २ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून दीड किलो आरडीएक्सदेखील जप्त करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पंजाब पोलिसांनी हा हल्ला दशहतवादी असल्याचे नाकारले आहे. ऑफिसमध्ये झालेल्या विस्फोटकांमुळे हा स्फोट झाला आहे. त्यामुळे हा दशहतवादी हल्ला नाही. मोहालीच्या विजिलेंस बिल्डिंगमध्ये हा स्फोट झाला आहे, असंही स्पष्टीकरण पंजाब पोलिसांनी दिले आहे.
मुख्यमंत्री डीजीपींकडून घटनेची पूर्ण माहिती घेत आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान हे सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. २४ एप्रिलला चंदीगडमधील बुडैल तुरुंगाजवळ विस्फोटके सापडले होते. त्याच्या काही दिवसांनंतरच हा स्फोट झाला आहे. पोलिसांना सोमवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास विस्फोट झाल्याची सूचना मिळाली. किती नुकसान झाले आहे, याची अजूनही माहिती समोर आलेली नाही. वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहे. फाॅरेन्सिक टीम्स बोलविण्यात आल्या असून घटनेचा तपास सुरू आहे.