मुंबई: सुपरस्टार शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याजवळच्या जीवेश या 21 मजली इमारतीच्या 14 व्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
वांद्रे पश्चिमेकडील बँडस्टँडजवळ ही इमारत आहे. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या तब्बल 8 गाड्या आणि सात जम्बो टँकर्स घटनास्थळी दाखल झाले. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तसेच अदाणी इलेक्ट्रीसिटी कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारीदेखील उपस्थित होते.