अकोला दि.9: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या, तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने दि.27 जानेवारी 2022 रोजीच्या प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याच्या कार्यक्रमातील सुनावणीच्या टप्प्यापासून प्रभागाच्या सीमा निश्चित करण्यासाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील खालील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात येणार आहेत.
अ.क्र. | तालूक्याचे नाव | ग्रामपंचायतीची संख्या |
1 | तेल्हारा | 23 |
2 | अकोट | 44 |
3 | मुर्तिजापूर | 51 |
4 | अकोला | 54 |
5 | बाळापूर | 27 |
6 | बार्शिटाकळी | 47 |
7 | पातूर | 28 |
एकूण | 274 |
प्रभाग रचना कार्यक्रमानुसार प्रभाग रचना कामास सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग रचना कार्यक्रमानुसार दि. 27 मे 2022 रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येईल,असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं./ जि.प./ पं.स. निवडणुक विभाग संजय खडसे यांनी कळविले आहे.