नवी दिल्ली: मायक्रोब्लाॅगिंग असलेले ट्विट (Tweet) खरेदी करणारे इलाॅन मस्क यांनी आपल्या रहस्य मृत्यूसंदर्भात चर्चा केली आहे. आपल्या आश्चर्यकारक आणि वादग्रस्त ट्विटने नेहमीच चर्चेत राहणारे इलाॅन मस्क यांनी पहिल्यांदाच आपल्या मृत्यूसंदर्भात भाष्य केलेले आहे. ते म्हणाले की, “माझा रहस्यमयरित्या मृत्यू झाला की, तुम्हाला हे जाणून आनंदच वाटेल”, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलेले आहे.
इलाॅन मस्क यांच्या अशा बोलण्यामुळे त्यांचे चाहते काळजीत पडलेले दिसत आहेत. मस्क यांना रशियन अधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आली होती, त्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी अशा आशयाचे ट्विट केलेले आहे. मस्क यांनी रशियन स्पेस एजन्सीचे संचालक दिमित्री ओलेगोविच रोगोजिन यांनी रशियाच्या माध्यमांसमोर केलेले विधान शेअर केलेले होते. रोगोजिन पुढे म्हणाले होते की, “इलाॅन मस्क युक्रेनमध्ये फुटिरतावाद्यांना शस्त्र पुरवठा करत आहेत. तुम्ही किती मुर्ख असलात तरी चालेल, या प्रकरणात इलाॅन मस्क जबाबदार ठरविले जाणार”, असे भाष्य रोगोजिन यांनी माध्यमांना सांगितले.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय रोस्कोस्मोसचे प्रमुख रोगोजिन यांनी ट्विटरचे (Tweet) मालक इलाॅन मस्क यांनी निशाणा साधला होता आणि मस्क यांना युक्रेनला शस्त्रे पुरविण्याची धमकीदेखील दिली होती. रोगोजिन यांनी रशियन माध्यमांना सांगितले की, “इलाॅन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने इंटरनेट टर्मिनलला लष्करी हेलिकाॅप्टरद्वारे मारियुपोल शहरात नाजी आजोव बटालियन आणि युक्रनी मरीन फुटिरतावाद्यापर्यंत पोहोवचले. आमच्या माहितीनुसार स्टारलिंक उपकरणची डिलिव्हरी पेंटागनद्वारे करण्यात आली होती.”