महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्याबरोबर सावंतवाडीतील पत्रकार विनायक गांवस यांना विनाकारण गुन्ह्यात गोवण्यात आल्या संदर्भात. दाद मागण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई च्यावतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी 17 मेला धरणे आंदोलन छेडणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
याबाबतची चर्चा गंगाखेड परभणी येथील राज्यातील तालुकास्तरावर आदर्श पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर झाली. यावेळी परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्याशी चर्चा झाली. व त्यांनी याप्रकरणी तातडीने आंदोलन करण्याचे आदेश दिले. तर राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे इशारा दिला आहे.
दै.कोकणसाद चे सावंतवाडी प्रतिनिधी विनायक गांवस हे वृत्तांकन करण्यासाठी कोलगाव येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रांमध्ये गेले असता त्यांना नाहक गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. त्यामुळे पत्रकारावर अन्याय झाला आहे. त्यामुळे यापुढे पत्रकारांना काम करणे कठीण होणार आहे. या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी मंगळवार 17 मे २०२२ रोजी अ भा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील इतर पत्रकारांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
परिषदेने शासनाकडे पत्रकारांच्या विविध प्रश्नाबाबत च्या मागण्या वेळोवेळी सादर केल्या आहेत. यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना लागू झाली मात्र ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रस्तावात त्रुटी काढून अधिकाऱ्यांकडून ते प्रस्ताव नामंजूर केले जातात. या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा तालुका व जिल्हास्तरावर धरणे आंदोलनाचा निर्णय परिषदेने घेतला आहे . याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तील गांवस यांच्या बाबतच्या या घटनेचा निषेध करण्यात आला असल्याचे परिषदेने प्रसिद्धीस दिले आहे.
दरम्यान २० एप्रिलच्या मध्यरात्री अचानक करण्यात आलेले वीज भारनियमनामुळे नागरिक हैराण होते ते संतप्त झाले. त्यामुळे नागरीक लगेच तिथे पोहोचले. वरिष्ठ वीज अधिकारी व कर्मचारी यांनी फोन,मोबाईल वर रिप्लाय दिला नाही,त्यामुळे नागरीकांना स्पष्टीकरण मिळाले नाही, त्यामुळे ज्या काही घटना घडल्या ह्या माँपसायकाँलोजीमुळे त्या घडून गेल्या.या घटनेचे लाईव्ह करत असताना वरिष्ठ वीज अधिकाऱ्यांनी किमान आपल्या मोबाईलवरूंन संतप्त नागरीकांसमोर वेळेत आपली बाजू मांडली असती तर कदाचित पुढील घटना टाळता आली असती. फेसबुक लाईव्हवर त्यांचेही म्हणणे आले असते.
त्यासाठीही दै.कोकणसाद चे प्रतिनिधी प्रयत्नशील होते. इतकेच काय, घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी येथील पोलिसांना फोन करून त्याची माहितीही दिली.पोलिसांनीही आपल्या परिने परस्थिती हाताळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तसे न होता उलट पत्रकार विनायक गांवस यांच्यावर चुकीच्या पद्धतीने सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्या उपस्थिती मध्ये पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या कानी घातली व निवेदनही सादर केले तत्पूर्वी जिल्हा पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरसकर तसेच सावंतवाडी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर िंसधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य हरिश्चंद्र पवार यांनी वेळोवेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट घेऊन निवेदने देऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली व पत्रकार गावस याला या प्रकरणांमध्ये गोवले जात असल्याची बाब लक्षात आणून दिली तरीही या प्रकरणात अन्यायकारक पत्रकाराचे नाव समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 17 मेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांनी प्रसिद्धीस दिले आहे.