हिवरखेड(धीरज बजाज)- दि 06 मे रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास मिळालेल्या खात्रीशिर माहितीवरुन हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोठे अड़गाव बु. मधील चुनारपुरा मधील आरोपी गुलाम कासिफ गुलाम आसिफ, गुलाम सोनू गुलाम आसिफ, फ़िरोजाबी यांच्या राहत्या घरामध्ये एकुन 5 धारदार अवैध शस्त्र मिळून आले. त्यात मोठी लांब धारदार तलवार जिची लाम्बी 82 सेमि, एक लांब तलवार जिची लाम्बी 85 सेमि, एक स्टीलचा लांब मोठा फरशा, स्टिलची कुरहाड ज्याची लांबी 103 से मि, एक लोखंडी फरशा, मोठी कुरहाड जिची लाम्बी 105 सेमि 5, एक मोठा लांब चाकु लाम्बी 35 सेमि, असा एकुण 17500 रूपयांचा धारदार तलवारी, चाकु, फरशा, कुऱ्हाडीचा अवैध शस्त्रसाठा, मुद्देमाल विशेष पथकाने जप्त करून वरील आरोपी विरुद्ध हिवरखेड़ पोलीस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4, 25 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.
सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांच्या पथकाने अडगाव बु, हिवरखेड़ पो. स्टे. येथे केली.
शस्त्रसाठा गोळा करण्यामागील कारण काय?
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे अडगाव बुजुर्ग हे अत्यंत संवेदनशील गाव असून येथे चुनारपुरा परिसरात शस्त्रसाठा निघून आल्याने याची सर्वसामान्य नागरिकांनी धास्ती घेतली आहे.
हा धारदार शस्त्रसाठा नेमका कशासाठी गोळा केल्या गेला? याचा कशासाठी वापर होणार होता? सामाजिक सलोखा बिघडविण्याचा हा प्रकार होता की वैयक्तिक वादाची किनार होती? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उफाळत असून याचा सखोल तपास करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचे आव्हान हिवरखेड पोलिसांपुढे आहे.