नाशिकरोड : एक अल्पवयीन मुलगा पबजी खेळत आपल्याच नादात रेल्वे एक्स्प्रेसमधून निघाल्याची माहिती नाशिकरोड रेल्वेस्थानक पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी रेल्वेगाड्यांचा कसून शोध घेत अखेर मुंबईला जाणार्या तपोवन एक्स्प्रेसमधून त्याला ताब्यात घेतले. मुलगा सुखरूप पाहून त्याच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
नागेश असे या मुलाचे नाव आहे. तो हरविल्याची तक्रार वडील माधव जावरे यांनी नांदेडच्या कुंटूर पोलिस ठाण्यात दिली होती. नागेशचे फोटो मिळवून नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी आपल्या ग्रुपवर पाठविले. रेल्वेगाडीची वेळ झाल्याने पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी सहकार्यांसह गस्त सुरू केली.