अकोट (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे पालकमंत्री यांच्या निधी मधून रोजगार हमी योजनेतून मनरेगा अंतर्गत 25 लक्ष रुपयेचा रोड मंजूर झाला आहे. या रोडचे उदघाटन सुद्धा झाले आहे. सदर रोड हा रोजगार हमी मनरेगा मधून असल्यामुळे मजुराने काम करायचे आहे या बाबत ग्राम पंचायत बोर्डी यांनी मजूर करिता दोनवेळा गावात दवंडी दिली होती. परंतु गावातील एकही मजूर उपलब्ध नसल्याने रोडच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. ठेकेदार, ईजिनियर, रोजगार सेवक यांनी संगणमत करून अकोट येथील 6 खोटे मजूर बोर्डीला आणून रोडच्या कामाला सुरूवात केली होती. तरी या बाबत वरिष्ठ अधिकारी व इंजिनिअर यांना त्वरित फोनद्वारे माहिती देण्यात आली होती.
सदर 6 मजूर हे कुठले रहीवाशी आहेत,त्यांचेकडे स्वतःचे जॉबकार्ड आहेत की नाही,जे 6 मजूर आज रोडवर आजरोजी काम करीत होते. त्याच 6 लोकांचे नावाने मस्टर भरले की आणखी काही खोट्या लोकांचे नावे मस्टर भरले आहेत,आज परेनंत सदर रोडच्या कामाचे किती मस्टर भरण्यात आले,कोण्या मजुराच्या नावाने मस्टर भरून किती पैसे काढण्यात आले आहे. प्रतिदिन रोजनदारी प्रमाणे आज परेनंत किती रुपये मजुराच्या नावावर पैसे काढण्यात आले.याची सर्व चौकशी करावी. व संबंधीत, कर्मचारी,रोजगार सेवक, इंजिनियर,व काम करीत असलेले खोटे मजूर यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. व सुरू असलेले रोडचे बोगस,व खोटे काम तात्काळ थांबवावे.या बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अकोट यांचेकडे रीतसर लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया
ठेकेदार यांनी आजरोजी जे अकोट येथील मजूर रोडच्या कामाला बोर्डी येथे आणले होते या बाबत मला माहिती नव्हती मला माहिती मिळताच मी बोर्डीला आलो व रोडवर सुरू असलेले मजूराचे काम ताबडतोड थांबवले.
पटेरिया इंजिनियर अकोट