अकोला दि.३: राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे बुधवार दि.४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-:
बुधवार दि.४ रोजी दुपारी अडीच वा. पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाडा संदर्भात आढावा सभा, दुपारी साडेतीन वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत, अकोला व अचलपूर प्रक्षेत्रकरिता सादर केलेल्या विविध विकास कामांच्या प्रस्तावाबाबत आढावा सभा. दुपारी साडेचार वा. अकोला जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बांबू लागवड बाबत आढावा सभा, सायंकाळी ५ वा ३५ मि. नी प्रविण इंगळे, सुरक्षा रक्षक मनपा अकोला यांचे तक्रारीचे अनूषंगाने सुनावणी, स्थळ – छत्रपती सभागृह,नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला. सायंकाळी ६ वा. जिजाऊ कमर्शियल को-ऑप बँक,अकोला शाखाचे स्थानांतर व लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ-प्लॉट क्र 4,मांगल्य, एस. श्री. आय, कॉलमी, सहकार नगर, गौरक्षण रोड, अकोला, नंतर सवडीने अमरावती कडे प्रयाण.