मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ऑफलाईन परीक्षा 1 जून ते 15 जुलैदरम्यान होणार आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस ठरलेल्या परीक्षांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परीक्षा जूनमध्ये गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी कुलगरूंसोबत ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत परीक्षा ऑफलाईन आणि 1 जून ते 15 जुलै या कालावधीत घेण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या. ऑफलाईन परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असावेत, असेही ठरल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, हा निर्णय विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे.