अकोला दि.26 : निरोगी आयुष्यासाठी जंतनाशक गोळी घेणे अंत्यत आवश्यक असुन एकही लाभार्थी या गोळी घेण्यापासुन सुटणार नाही याची जबाबदारी सर्व आरोग्य कर्मचारी व वैद्यकिय अधिकारी यांनी घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी केले.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय जंतनाशक मोहीमेची सुरवात प्राथमिक आरोग्य केंद्र,आपातापा येथुन आज झाली. यावेळी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगळे, आपातापा येथील सरपंच स्वाती सषिश टोबरे, आपोती बु. येथील सरपंच वैभव तराळे, प्रमुख पाहुने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा माता बाल संगोपण अधिकारी डॉ. मनिष शर्मा, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. जगदिश बनसोडे, वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र आपातापा येथील डॉ. श्रीकांत भेंडेकर आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
जंतनाशक मोहिमेच्या माध्यामातून 1 ते 19 वर्ष वयोटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळया देण्यात येत असून त्यांची संख्या 3 लाख 50 हजाराहुन अधिक आहे. यामध्ये मुलांना परजीवी जंतापासुन आजार उद्भवण्याचा धोका अधिक असतो. दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजपणे होण्याची शक्यता असते. परिणामी कुपोषण, रक्ताक्षय, पोट दुखणे, भुक कमी होणे, शौचामध्ये रक्त पडणे, अतिसार आदि विविध समस्या मुलांमध्ये दिसुन येतात. त्यामुळे पात्रता वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्या घेणे आवश्यक आहे. ही मोहिम दि. 25 ते 29 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्र आणि आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातुन पात्रता मुलांना जंतनाशक गोळया वाटप करणे सुरु आहे.
जिल्हा परिषदचे सदस्य शंकरराव इंगळे म्हणाले की, वैयक्तिक स्वच्छता राखणे ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असुन वैयक्तिक स्वच्छतेसोबत परिसर स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. सर्व शिक्षकवृदांनी या कार्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. मनिष शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास राठोड यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता सी.एच.ओ. श्री. हागे, उमेश ताठे, आरोग्य सहायक श्रीमती. नंदेश्वर, डॉ. इंगळे, डॉ. वानखडे, औषधिनिर्माता अधिकारी श्रीमती आठवले, गटप्रवर्तक आपोतीकर, आशासेविका आदि उपस्थित होते.