अकोट(शिवा मगर)- चोहट्टा बाजार-सध्या राज्यात व अकोला ग्रामीण मध्ये मोठया प्रमाणात वीज भार नियमन (लोडशेडिंग) सुरू आहे.महाराष्ट्र मध्ये शिवसेना-कॉग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आहे.या तीन पक्षाच्या सरकारने राज्यात अंदाधुंदी कारभार सुरू केला आहे.हे सरकार विविध आघाडीवर अपयशी ठरत आहे.
आता तर अकोला जिल्ह्यात ग्रामीणमध्ये वीज भारनियमन सुरू केले आहे.लोडशेडिंग मुळे शेतकरी, सामान्य नागरिक,विध्यार्थी, रुग्ण,व्यापारी त्रस्त झाले आहेत. लोडशेडींग च्या विरोधात भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा आकोट तालुक्याच्या वतीने चोहट्टा बाजार येथे वीज मांडळा समोर कंदील आंदोलन छेडण्यात आले.या वेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो,लोडशेडिंग बंद करा, आघाडी सरकार हाय हाय.ठाकरे सरकार हाय हाय,आघाडी सरकारचा निषेध असो अश्या घोषणाबाजी केली. या आंदोलनात भाजपा चे राजू नागमते, भाजपा जिल्हा चिटणीस मधुकरभाऊ पाटकर,भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तू पाटील गावंडे माजी सभापती विजयसिंग सोळुंके,आत्मा समिती चे माधवराव बकाल,शेतकरी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस संदीप उगले,तालुका सरचिटणीस किशोर सरोदे,ओबीसी चे गजाननराव नळे,वैद्यकीय आघाडी चे डॉ मनोहरराव चाकोते,ग्राममंडळ केळीवेळी चे अध्यक्ष किशोर बुले,चेतन डोईफोडे, पुरुषोत्तम सिरसाट,गोपाल पेटे,सतीश धुमाळे,मंगेश ताडे,ज्ञानेश्वर आढे,मोहन कपले, निलेश वहिले,रमेशभाऊ धुमाळे,अनिल पाटील इंगळे,शुभम लोणे,श्रीकांत गाडेकर,,रणजित बुले,गजानन पडोळे, एकनाथ पाटील नारे,मंगेश घुले,विनोद साबळे,काशिनाथ हिंगणकर,विष्णुभाऊ आढे,गणेशराव पागधुने,पुरुषोत्तम धुमाळे,वसंत दोड,सरपंच आशिष निपाने,सुभाष मुकुंदे,रुपेश कोल्हे,रामेश्वरराव पाथरे संतोष ढोणे,मोहन घुगरे, वासुदेव खुळे,सुधाकरराव खोटरे,कोरडे,बोरचाटे,निलेश धुमाळे,निलेश वाघोळे,गजानन चरहाटे,हरिभाऊ गोंडचवर,निलेश ढोणे,यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.