बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील बफरझोन मध्ये येत असलेल्या कासोद शेत शिवारातील ग्राम बोर्डी येथील शेतकरी साबीर अली शाहदत अली यांचे कासोद येथील गट क्रमांक 302 मधील गैरअर्जदार साबुद्दीन शफीकोद्दीन याने धुर्यावरील आडजातीच्या 17 झाडांची कुठलीही परमिशन न काढता,विना परवानगी अवैध कटाई केली आहे.यामध्ये 14 झाडे निंबाची,2 झाडे मोहाचे,1 झाड पळसाचे असे एकून 17 झाडांचा समावेश आहे.सदर 17 झाडे ही मशीनद्वारे कटाई करून आजरोजी माल शेतात जागेवर पडलेला आहे.या बाबत अकोट वनपरिक्षेत्र अधिकारी नरनाळा रेंज अकोट यांचेकडे अर्जदार शेतकरी साबीर अली शाहदत अली यांनी लेखी तक्रार करून गैरअर्जदार यांचे विरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या बाबत अधिकारी वाकोडे यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांना शेतात घटनास्थळी पाठवून कापलेल्या झाडांचा पंचनामा करून अहवाल मागितला आहे.त्या वरून फॉरेस्टचे कर्मचारी खांडवाये व देशपांडे यांनी कासोद येथील गट क्रमांक 302 मधील गैरअर्जदार यांनी कटाई केलेल्या झाडांचा शेतात येऊन पाहणी करून पंचनामा केला आहे व सदर अहवाल वरिष्ठ अधिकारी यांचेकडे सादर केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.या अहवाल वरून गैरअर्जदार यांचेवर आता नेमकी कुठली कारवाई करण्यात येते याकडे अर्जदार यांचे लक्ष लागले आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली बरेच गावे ही फॉरेस्ट अंतर्गत बफरझोन मध्ये गेली आहेत या गावा मध्ये गेल्या काही दिवसांन पासून अवैध कटाई करून विक्री करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असतांना बोर्डी येथील गैरअर्जदार शहाबुद्दीन शफीकोद्दीन याने धुर्यावरील चक्क 17 जीवंत झाडे कत्तल केली आहे ,मागे रामापूर येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात कटाई करण्यात आल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा ट्रक जप्त करून कारवाई करण्यात आली होती.पुन्हा विना परवानगी 17 झाडे मशीनद्वारे कटाई करण्यात आली आहे व माल जागेवर पडलेला आहे सदर माल हा जप्त करून गैरअर्जदार यांचे विरुद्ध कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
शेतकरी साबीर अली शाहदत अली बोर्डी.