अकोला– माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केलेल्या महाडिबीटी पोर्टलवरून सामाजिक न्याय विभाग व विजाभज, विमाप्र कल्याण विभागाच्या पोष्ट मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नोदंणीकृत झालेल्या अनुसूचित जाती व विजाभज.इमाव प्रवर्गातील शिष्यवृत्ती आवेदनपत्र विविध महाविद्यालयस्तरावर मोठया प्रमाणात प्रलंबित आहे. प्रलंबित अर्ज महाविद्यालयास्तरावर तातडीने निकाली काढावे, असे सूचना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी दिले.
महाडिबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती योजना व व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता योजना राबविण्यात येत आहे. या योजनाकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत 2021-22 शैक्षणिक वर्षातील महाडिबिटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता नविन व नुतनीकरण अर्ज भरण्यांची सुविधा दि. 14 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करुन देण्यांत आली आहे. या योजनेअंतर्गत 17 हजार 542 तर विजाभज.इमाव व विमाप्र प्रवर्गातील 25867 आवेदन पत्रे नोंदणीकृत झालेली आहे. नोदंणीकृत झालेल्या अर्जापैकी अनुसूचित जाती प्रवर्गातल 12 हजार 402 तर विजाभज.इमाव व विमाप्र प्रवर्गातील 20739 स्तरावर निकाली काढण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही महाविद्यालयस्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील 2730 तर विजाभज.इमाव व विमाप्र प्रवर्गातील 2786 शिष्यवृत्ती आवेदनपत्र विविध महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहे. याकरीता संबंधित महाविद्यालयांना वेळोवेळी विविध माध्यमाव्दारे सूचना देण्यात आले. प्रलंबित अर्जाची संख्या लक्षात घेवून संबंधीत महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित अर्जाची शासन निर्णयानुसार पडताळणी करुन पात्र अर्ज जिल्हा कार्यालयाच्या लॉगीनवर पाठविण्यात यावे. तसेच ज्या महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क अद्यापही मंजुर झालेले नाही असे महाविद्यालयांनी शुल्क मंजुरीची कार्यवाही जलद गतीने करावी. पात्र मागसवर्गीय विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे समाजकल्याण कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.