अकोला– अन्न व औषध प्रशासन विभागाव्दारे मे. अथर अंडा सेंटर ॲण्ड कन्फेक्शनरी, ता.तेल्हारा जि. अकोला येथे प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री होत असल्याचे माहिती मिळाली. याआधारावर मे. अथर अंडा सेंटर ॲण्ड कन्फेक्शनरीवर अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी दुकानाची तपासणी करून केसर नखवाली गोल्ड स्वीट सुपारी मोठे पाउच 30 नग एकूण किंमत 1 हजार 800 रुपये, केसर नखराली गोल्ड स्वीट सुपारी लहान पाउच 20 नग एकूण 1 हजार 200 रुपये, केसर युक्त आंटी स्वीट सुपारी 20 नग किंमत एकूण 1 हजार 200 रुपये, दिल्लगी स्वीट सुपारी 10 नग एकूण किंमत सहाशे रुपये असे एकूण जप्त साठ्याची किंमत 4 हजार 800 रुपयेचा प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा जप्त केला.
त्या दुकानदारास अटक करुन त्यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदाचे कलम 26(2)(i) सह कलम 26(2)(iv) सह कलम 27(2)(e)(f) सह कलम 30(2)(a) शिक्षा पात्र कलम 59 व भा.दं.वि. कलम 188,272,273,328 नुसार तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करुन दुकानदारास पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले. ही कार्यवाही अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार व स्टाफ नमुना सहायक भिमराव नरवणे यांच्या उपस्थितीत झाली.