अकोट (देवानंद खिरकर)- पिक कर्जाच्या नावाखाली बँक शेतकऱ्याची लुबाडणूक करत आहेत.शेतकऱ्यांने उचलल्या कर्जाला ३६५ दिवसाचे व्याज लावून बँक वसुली करत आहेत बँकेने ३१ मार्च अंतिम तारीख ठेवली आहे ही तारीख न ठेवता ३६५ दिवसाचे मुदत देण्यात यावी ही मागणी आकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी विधान सभेत वेळोवेळी प्रश्न मांडला शेतकऱ्याचा भावना लक्ष वेधी लाऊन.सभापती महोदय यांच्या कडे माडण्यात आला त्यावर कोणतेही शासनाने अमलबजावणी केली नाही व शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच ठेवण्याचा झपाटा ठेवला आहे.
उलट ६ महिनाच्या कर्जाला १२महिन्याचा व्याज लावून अन्याय केला जातो आहे, हे शेतकरी विरोधी धोरण अवलंबिले जात आहे यावर लवकरच तोडगा काढण्यात यावा व शेतकऱ्यांना ज्ञाय द्यावा.
या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयं देण्यात आले यावेळी उपस्थित प्रविण डिक्कर भाजप सरचिटणीस यूवा मोर्चा राजेश चंदन शहर आढेक्ष युवा मोर्चा निलेश नवघरे अक्षय भगत सतीश सावरकर नायशे मंगेश ताडे श्रीकांत गाडेकर विक्की बुले अजय खडसान गोवर्धन कराले उपस्थित होते.