• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुंबईत हनुमान चालिसा पठणावरून संघर्ष पेटला! शिवसैनिक आक्रमक, राणांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न

adil by adil
April 23, 2022
in Featured, महाराष्ट्र, संपादकीय
Reading Time: 1 min read
126 1
0
मुंबईत हनुमान चालिसा पठणावरून संघर्ष पेटला! शिवसैनिक आक्रमक, राणांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न
19
SHARES
908
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई:   मुंबईत शनिवारी हनुमान चालिसा पठणावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’समोर अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी सकाळी हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे आव्हान दिले आहे. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी ‘मातोश्री’समोरच ठाण मांडले आहे. मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे ठेवण्यात आला आहे. दरम्यान, राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार येथील आपल्या निवासस्थानी आहेत. राणांच्या घरांसमोरही शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली असून राणा खाली या असे शिवसैनिकांनी आव्हान दिले आहे.

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बॅरिकेडिंग तोडून राणांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. राणांच्या घरासमोर पोलिसांकडून शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसैनिकांची राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. राणा दाम्पत्य जोपर्यंत मुंबई सोडून जात नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी आक्रमक भुमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

मशिदींवरील भोंगे बंद केले नाहीत, तर त्याच मशिदींसमोर वेगळा भोंगा लावून हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. भोंगे उतरवण्यासाठी मनसेने राज्य सरकारला ३ मेची डेडलाईन दिली आहे. हा विषय मशिदींवरील भोंग्यांचा असताना, यात उडी घेत राणा दाम्पत्याने थेट ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करून या वादाला नवे तोंड फोडले.

राणा दाम्पत्याला अमरावतीतच रोखण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न होता. मात्र, तेथील शिवसैनिकांना गुंगारा देत राणा दाम्पत्य ‘मातोश्री’ मोहीम फत्ते करण्यासाठी आधीच खार भागातील फ्लॅटवर मुक्कामी दाखल झाले आहे. हे समजताच शिवसैनिकांचा मोठा जमाव त्यांच्या इमारतीसमोर जमला आहे.

Tags: Hanuman Chalisa!Rana's building
Previous Post

दक्षता घेण्याचे आवाहन; जिल्ह्यात उष्णेतेची लाट कायम, पाऊस व वादळाची शक्यता

Next Post

सातारा : आयएनएस वागशीर पाणबुडीला कराडची यंत्रणा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
आयएनएस वागशीर पाणबुडीला

सातारा : आयएनएस वागशीर पाणबुडीला कराडची यंत्रणा

अलर्ट मोडवर

कोकण अलर्ट मोडवर! दोन दिवस वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाची शक्यता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.