अकोला – जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा जिल्ह्यातील 24 केंद्रावर होणार असून एकूण 6351 विद्यार्थी या परिक्षेस उपस्थित राहणार आहे. या परिक्षेकरीता विद्यार्थ्यांनी प्रवेश डाऊनलोड करुन शनिवार दि. 30 एप्रिल रोजी सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत दिलेल्या परिक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी केले आहे.
परिक्षेकरीता लागणारे प्रवेश पत्र www.cbseitms.nic.in या संकेत स्थळावर लॉगीन करून प्राप्त करावा. यासाठी युजर नेम हे विद्यार्थ्यांला ऑनलाईन अर्ज भरतांना मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड, विद्यार्थ्यांचे जन्म तारीख आवश्यक राहील. प्रवेश पत्र डाऊनलोड केल्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्याकडून स्वाक्षाकिंत करून प्रवेश पत्र परिक्षा पर्यवेक्षकाकडे जमा करावा लागणार आहे. हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरलेले असल्यामुळे त्यात कोणताही बदल करण्यात येऊ शकत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय, बाबूळगाव (जहाँ) येथे कार्यालयीन वेळेत किंवा दुरध्वनी क्रमांकावर 07242258981 संपर्क साधावा.
या संकेत स्थळावर लॉगीन करून प्राप्त करावा. यासाठी युजर नेम हे विद्यार्थ्यांला ऑनलाईन अर्ज भरतांना मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड, विद्यार्थ्यांचे जन्म तारीख आवश्यक राहील. प्रवेश पत्र डाऊनलोड केल्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्याकडून स्वाक्षाकिंत करून प्रवेश पत्र परिक्षा पर्यवेक्षकाकडे जमा करावा लागणार आहे. हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरलेले असल्यामुळे त्यात कोणताही बदल करण्यात येऊ शकत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय, बाबूळगाव (जहाँ) येथे कार्यालयीन वेळेत किंवा दुरध्वनी क्रमांकावर 07242258981 संपर्क साधावा.