राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा कहर सुरू असून सोमवारी विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि अकोला या शहरांचे तापमान 44.8 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले आहे. या हंगामातील तापमानाची ही सर्वोच्च नोंद आहे.
राज्याच्या सर्वच भागांत सरासरी कमाल तापमानात 2 ते 4 अंशांपर्यंत वाढ झाली आहे. उष्णतेचा कहर वाढत असतानाच 21 ते 23 एप्रिल या काळात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.