अकोला- पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून व जिल्हाधिकारी निमा अरोरा मार्गदर्शनाखाली साकारलेल्या ‘डिजिटल राहुटी’ या उपक्रमास राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानअंतर्गत सर्वोकृष्ट कल्पना गटात तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. उपक्रमाअंतर्गत कोरोना काळात व्हिडीओ, टेलिग्राफी व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्रामीण व शहरी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना विविध सेवा देणे, त्यामाध्यमातून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे या नाविन्यपूर्ण संकल्पनेकरीता पारितोषिक जाहीर झाले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
राज्य शासनातर्फे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरीता राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान राबविण्यात आले होते. या नाविन्यपूर्ण अभियांनाअंतर्गत सर्वोकृष्ट कल्पना म्हणून शासकीय संस्था गटातून तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. त्यात रोख रु. 20 हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.