• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत ; पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रात विकासकामांचे भुमिपूजन

Our Media by Our Media
April 15, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, बातम्या आणि कार्यक्रम, योजना
Reading Time: 1 min read
86 1
0
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत ; पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रात विकासकामांचे भुमिपूजन
15
SHARES
622
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.15 राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते आज जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, महानगरपालिकांच्या नागरी क्षेत्रातील विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत ही विकास कामे होणार आहेत.

त्यानुसार, आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास नगरपरिषद अकोट येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दिव्यांगांना फिरते विक्री केंद्रांचेही वितरण करण्यात आले. अकोट नगर परिषदेचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 16, संकल्प कॉलनी अकोट येथे पार पडला. या कार्यक्रमास आ. प्रकाश भारसाकळे, तहसिलदार निलेश मडके, नगर परिषद प्रशासन अधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, माविमच्या वर्षा खोबरागडे आदी उपस्थित होते. अकोट नगरपरिषदेस या योजनेअंतर्गत 12 कोटी 56 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून या निधीत अकोट नगर परिषद हद्दीतील एकही विकासकाम आता शिल्लक राहणार नाही,असे पालकमंत्री कडू यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री कडू यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत सांगितले की, महापुरुषांनी नेहमीच सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कार्य केले आहे. त्यांच्याकडून आपण भारतीय आहोत हा विचार आपण शिकला पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्यानंतर त्यांनी तेल्हारा नगरपरिषदेतील विकासकामांचा शुभारंभ अकोट येथील सार्वजनिक वाचनालयातून ऑनलाईन पद्धतीने केला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. तेल्हारा नगरपरिषदेच्या हद्दीत या योजनेतून 1 कोटी 47 लक्ष रुपयांची कामे होणार आहेत.

त्यानंतर अकोला मनपा हद्दीत साईनगर प्रभाग क्रमांक 8 येथे 19 कोटी 56 लाख रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास मनपा उपायुक्त पंकज जावळे, क्षेत्रिय अधिकारी दिलीप जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री कडू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन केले, तसेच उपस्थित नागरिकांना शुभेच्छा ही दिल्या.

त्यानंतर बाळापूर नगर परिषदेच्या हद्दीतील 12 कोटी 1 लाख 23 हजार 745 रुपयांच्या निधीतील कामांचे भुमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास तहसिलदार सैय्यद एहसानुद्दीन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.

त्यानंतर बार्शी टाकळी नगरपरिषद व मुर्तिजापूर नगरपरिषद हद्दीतील विकासकामांचे भुमिपूजन त्यांनी केले. तसेच मुर्तिजापुर येथेही दिव्यांगांना रोजगारासाठी तिन चाकी ई- ट्रायसिकलचे वितरणही केले.

Tags: Akolabacchu kaduBhumi Pujanyojana
Previous Post

पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाड्याचा शुभारंभ: रोजगारासाठी प्रशिक्षण, अर्थसहाय्य, तांत्रिक मार्गदर्शनासाठी सहाय्य करणार-पालकमंत्री बच्चू कडू

Next Post

OBC & BJP : भाजप युपीच्या धर्तीवर महाराष्ट्रात राबवणार ‘ओबीसी पॅटर्न’

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
OBC & BJP : भाजप युपीच्या धर्तीवर महाराष्ट्रात राबवणार ‘ओबीसी पॅटर्न’

OBC & BJP : भाजप युपीच्या धर्तीवर महाराष्ट्रात राबवणार 'ओबीसी पॅटर्न'

एसटी

गुणरत्न सदावर्तेंचा 'करेक्ट कार्यक्रम' होताच मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी हजर होण्यास सुरुवात !

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.