भांबेरी(रक्षित बोदडे)- येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे आज गुरूवार (ता.14)रोजी सकाळी8.30 वाजता भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा समिती अध्यक्षा सारिका ताई भोंडे तर प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य अरविंद उमाळे हे होते मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भांबेरी येथील पटसंख्येवर असलेल्या 204 विद्यार्थ्यांना ऑल जर्नलिस्ट फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेचे तेल्हारा तालुका कार्याध्यक्ष रक्षित बोदडे,सारिका भोंडे, अँड.मंगेश बोदडे, जि.प.शाळा मुख्याध्यापक भिमराव थोरात यांच्या स्वखर्चाने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तर उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकत आपले विचार व्यक्त केले तर एजेफसी चे ता.कार्याध्यक्ष रक्षित बोदडे यांनी आपले विचार व्यक्त करत सांगितले कि दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या विदयार्थ्यांना वेगवेगळ्या शालेय साहित्याचे वाटप ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या माध्यमातून माझ्या स्वखर्चाने करण्यात येईल.
यावेळी पंचायत समिती सदस्य अरविंद उमाळे, शाळा समिती अध्यक्ष सारिका भोंडे, उपाध्यक्ष अरविना भोजने,माजी. तंटामुक्ती अध्यक्ष भारत बोदडे, एजेफसी ता.उपाध्यक्ष पत्रकार गणेश उमाळे, ता.सरचिटणीस धम्मदिप बोदडे,ग्रा.प.सदस्य गोपाल कोल्हे,दशरथ उमाळे,जय बोदडे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक युनुस परवेज ,जि.प.मुख्याध्यापक भिमराव थोरात,अनंत गर्जेसर,जयश्री कुलदेशपांडे,हेमलता चव्हाण,गोपाल दातकर सर,मालवे सर यांच्यासह गावातील नागरिक व विदयार्थी उपस्थित होते