अकोला – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सप्ताहाअंतर्गत गुरुवार दि.14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी सात वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून ही प्रभात फेरी निघणार असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्गे अशोक वाटिका येथे प्रभात फेरीचा समारोप होईल. तेथे पोलीस बॅंड पथकाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन प्रभात फेरीचा समारोप होईल, या उपक्रमात सहभागाचे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.