अकोला- महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 ची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तेल्हारा येथील झरीनाका येथे पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक गठीत करुन 24X7 संयुक्त चेकनाका बुधवार दि.13 पासून कार्यान्वित करावे,असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले.
या आदेशात म्हटल्याप्रमाणे, झरीनाका चेकपोस्ट पासून झरी बाजार व दिवाण झरी, उमरशेवडी, चिचणी गाव व तलाई अंबा अपर्वा या परीक्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी व पोलीस यांनी दैनंदिन पेट्रोलिंग करावी. या परिक्षेत्रातून गोवंशाची कत्तल करण्यासाठी गाय, वळू, बैल यांची वाहतूक आणि निर्यात करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.