वीज मागणीत झालेली अभूतपूर्व वाढ, कोळशाच्या टंचाईमुळे राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी, वीज बिल भरुन सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. ज्या ठिकाणी वीज चोऱ्या वाढल्या आहेत त्या ठिकाणी भारनियमन केले जाणार आहे. कोळसा उपलब्ध नाही. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरु आहे.
किमान लोडशोडिंग होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.