• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

इथेनॉलनिर्मितीत महाराष्ट्राचा देशात डंका!

adil by adil
April 11, 2022
in Featured, तंत्रज्ञान, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
94 1
0
Ethanol
18
SHARES
680
VIEWS
FBWhatsappTelegram

सांगली- साखर कारखानदारीसाठी आता परवलीचा शब्द बनलेल्या इथेनॉलच्या निर्मितीत सलग चौथ्या वर्षी महाराष्ट्राने देशात आपला डंका कायम राखला आहे. मार्च 2022 अखेरच्या सहामाहीमध्ये तर राज्याने 13 कोटी 7 लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. याच काळात संपूर्ण देशात 82 कोटी 1 लाख लिटरचे उत्पादन झाले आहे. इथेनॉलचा वापर आणि उत्पादन याला चालना देण्यासाठी सरकारने थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्याचे धोरण जाहीर केले आहे. महागड्या पेट्रोलसाठी प्रभावी पर्याय म्हणून इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या वापरास चालना देण्याचे सरकारचे धोरण आहे. ब्राझीलमध्ये पेट्रोलमध्ये 23 टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जाते. भारतात उसाच्या रसापासून साखर केल्यानंतर शिल्लक मळीपासून इथिल अल्कोहोल आणि मिथिल अल्कोहोल तयार होते. इथिल अल्कोहोल हेच इथेनॉल म्हणून वापरात येत आहे. जानेवारी 2003 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

आधी पाच टक्के व नंतर दहा टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याची अनुमती दिली. त्यानुसार इथेनॉल ब्लेडिंग प्रोग्राम आखण्यात आला. आता हेच प्रमाण 20 टक्केपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील इथेनॉलचे उत्पादन आणि वापर यातील आघाडी ही साखर उद्योगासाठी दिलासादायक ठरत आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

देशात प्रामुख्याने सन 2018-2019 च्या हंगामापासून इथेनॉलच्या उत्पादनास गती आली. 18-19 मध्ये देशात 141 कोटी तीन लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले होते. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षात यात वाढच होत गेली आहे.

सन 2019 – 2020 मध्ये देशात 123 कोटी लिटर, 20-21 मध्ये 222 कोटी 4 लाख लिटर इथेनॉल निर्मिती झाली. आता मार्चअखेर साखर वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशात 82 कोटी 1 लाख लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षांत फक्‍त महाराष्ट्राने देशातील उत्पादनाच्या जवळपास 20 टक्के इथेनॉलचे उत्पादन करून आघाडी घेतली आहे.

Tags: Ethanol productionMaharashtra ranks firstState News
Previous Post

पवारांच्या घरावरील हल्ल्यात सहभागी असणारे एसटी कर्मचारी होणार बडतर्फ!

Next Post

शाळांच्या वेळा बदलणार, उष्णतेच्या लाटेमुळे निर्णय

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
School timing

शाळांच्या वेळा बदलणार, उष्णतेच्या लाटेमुळे निर्णय

03ca818f-0fc3-46ed-82e4-bb14fe50

जि.प.व.प्राथ.आदर्श सेमी इंग्रजी शाळा बोर्डी येथे शाळापूर्व तयारी अभियान मेळावा संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.