तेल्हारा अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे पिंवदळ खु. ग्रामपंचायत चे तात्कालिक ग्रामसेवक संतोष देशमुख यांनी तक्रारदार रघुनाथ गुलाबराव भिलकर यांनी खरेदी केलेल्या जागेची ग्रामपंचायत नमुना आठ अ रिकाॅर्ड ला नोंद न घेता परस्पर नमुना आठ अ प्रत व कर पावती सन १.७. २००९ ला दिली परंतु तक्रारदार रघुनाथ गुलाबराव भिलकर हे कालांतराने म्हणजेच आता.
पिंवदळ खु. ग्रामपंचायत चे विद्यमान ग्रामसेवक यांच्या कडे आपल्या स्वमालकीच्या मालमत्ता क्रमांक ५६ अ जागेचा नमुना आठ अ मागण्यास गेले.असता विद्यमान ग्रामसेवकांनी तुमच्या जागेची ग्रामपंचायत नमुना आठ अ रिकाॅर्ड ला नोंद नसुन तुमच्या ताब्यात असलेली जागा दुसर्याच्या म्हणजेच ज्या व्यक्ती कडून रघुनाथ भिलकर यांनी जागा विकत घेतली
त्या पुर्वीच्याच व्यक्तीच्या नावे असल्याचे सांगून जागेचा नमुना आठ अ देण्यास नकार दिला तेंव्हा तात्कालीन ग्रामसेवकाने केलेल्या करामतीचा भिलकर यांना चांगलाच झटका बसला असून त्यामुळे ही बाब यानिमित्ताने आता उघडकीस आली आहे