अकोट (देवानंद खिरकर)- कोणत्याही सण ऊत्सवांमध्ये शिस्तप्रिय वर्तन करणे हाच आपल्या आदर्शांचा खरा गौरव असल्याने कायद्याचे पालन करुन सण ऊत्सव साजरे करा असे आवाहन अकोला जिल्हा अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत यानी आकोटकराना केले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव, रामनवमी, रमजान या सण ऊत्सवांच्या पार्श्वभूमिवर आकोट शहर पो. ठाण्याद्वारे आयोजित शांतता समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आकोट ऊपविभागिय पो. अधिकारी रितु खोखर, ठाणेदार प्रकाश अहिरे, नायब तहसिलदार रविंद्र येन्नावार हे ऊपस्थित होते. सभेला मार्गदर्शन करतांना मोनिका राऊत यानी वाजंत्री, शोभायात्रेची वेळ, सोशल मिडीया, अफवा याबाबत विस्तृत माहिती दिली. त्यानी म्हटले कि, पारंपारीक शोभायात्राना परवानगी मिळणारच आहे.
परंतु त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या सक्षम अधिका-यांकडून घेणे बंधनकारक आहे. शोभायात्रांसाठी वेळेचे बंधन मुळीच शिथिल झालेले नाही. त्यामुळे निर्धारीत वेळेवर वाजंत्री बंद करणे आवश्यक आहे. मोठी वाजंत्री जसे कि, डिजे वगैरे मूळीच वाजविता येणार नाहीत. बँड, ढोलताशे आणि लहान स्पिकर वाजविता येतील. शोभायात्रा निर्धारीत वेळेवरच आटपाव्या लागतील. त्यासाठी वेळ वाढवून मिळणार नाही. प्रत्येक मंडळाने आपले स्वयंसेवक नेमावेत. ती यादी स्थानिक पो. स्टे. ला दाखल करावी आणि शक्यतो ह्या स्वयंसेवकांच्याच माध्यमातुन शोभायात्रेचे नियंत्रण करावे. त्यामूळे पोलिसांन बळाचा वापर करावा लागणार नाही. सोशल मिडीयावर जपून पोस्ट टाकाव्यात. भावना भडकविणा-या, तेढ निर्माण करणा-या, चिथावणीखोर, अफवा पसरविणाया पोस्ट टाकणाराना कायदा सरळ करेल. अफवांपासुन स्र्वानी सावध असावे. कोणत्याही बाबतीत शहनिशा करुनच वर्तन करावे. शोभायात्रेतील देखाव्यांमुळे कोणताही तणाव निर्माण होवू नये. कुणाच्या भावना दुखावू नयेत याचे भान राखण्याचेही आवाहन मोनिका राऊत यानी केले. या सभेला शहरातील अनेक प्रतिष्ठीत नागरीक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समीती, रामनवमी ऊत्सव समिती यांचे पदाधिकारी ऊपस्थित होते.